सिंधुदुर्ग-कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल !

सिंधुदुर्ग-कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल !

सिंधुदुर्ग – कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या  नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. लीना कबुल यांना शिवसेनेची 4, भाजपची 4 आणि मनसेचे 1 मत मिळाले आहे. तसेच या निवडणुकीत स्वाभिमान/काँग्रेसच्या उपमा गावडे यांना 5 तर भाजपच्या रेशमा कोरगावकर यांना 1″मत मिळाले आहे.

दरम्यान या नगरपंचायतीत चार जणांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. यातील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुषमा लवू मिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेली कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत आपआपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पाचही नगरसेवकांना व्हीप बजावला होता. तर राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गट स्थापन करुन गटनेता म्हणून माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांची निवड केली होती.

 

COMMENTS