धोनीच्या ‘त्या’ घोषणेनंतर मंत्री धनंजय मुंडे म्हणाले तुझा खेळ सदैव आठवणीत राहील !

धोनीच्या ‘त्या’ घोषणेनंतर मंत्री धनंजय मुंडे म्हणाले तुझा खेळ सदैव आठवणीत राहील !

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी याने एक मोठी घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी 20 क्रिकेटला धोनीनं अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निर्णयानंतर राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी धोनीचं कौतुक केलं आहे. याबाबतचं ट्वीट मुंडे यांनी केलं असून बॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय क्रिकेट चा इतिहास आणि भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत! तुझा खेळ सदैव आठवणीत राहील असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावरुन धोनीनं
निवृत्तीची घोषणा केली आहे. ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ असं म्हणत त्याने पूर्वीपासूनच्या फोटोंचा कोलाज करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?utm_source=ig_web_copy_link

माहीला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जातं. T20 विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी या ICC च्या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा धोनी कर्णधारपदी असताना भारताने जिंकल्या आहेत. कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे.  धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसणार आहे.

COMMENTS