अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी, धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट!

अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी, धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट!

बीड – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी भावूक पोस्ट केली आहे. अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात. तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित – उपेक्षित दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळाली, त्यातून या गोरगरीब कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी काम करणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या अप्पा’ अशी भावनिक पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.

https://t.co/owQxBvlWrZ

दरम्यान ‘येणाऱ्या काळात या गोर-गरीब -कष्टकरी, वंचित – उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले, तर तीच माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली, नव्हे तर गुरुदक्षिणा ठरेल’ असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात… तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर,…

Posted by Dhananjay Munde on Tuesday, June 2, 2020

 

COMMENTS