मंत्री दिवाकर रावते शेतक-यावर भडकले !

मंत्री दिवाकर रावते शेतक-यावर भडकले !

वाशिम –  राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क एका शेतक-याला दम भरला असल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी गावाला रावते यांनी आज भेट दिली होती. तिथल्या शेतक-यांनी लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी रावते यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी मंत्री मोहदय मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच भडकले असल्याचं दिसून आलं आहे. याबाबतची बातमी झी चोवीस तासनं दाखवली आहे.

दरम्यान दिवाकर रावते यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपण त्या शेतक-याला काहीही चुकीचं बोललो नसल्याचं म्हटलं आहे. शेत-यानच आपल्यासोबत उलटसुलट भाषा केली असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS