सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही, स्वर्गीय धर्मा पाटील यांच्या मुलाचाही मुख्यमंत्र्यांना आत्महत्येचा इशारा !

सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही, स्वर्गीय धर्मा पाटील यांच्या मुलाचाही मुख्यमंत्र्यांना आत्महत्येचा इशारा !

धुळे – काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात आत्महत्या करणा-या स्वर्गीय धर्मा पाटील यांच्या मुलाने अनोखं आंदोलन केलं आहे. सरकारने आश्वासन पूर्ण केले नसल्याच्या निषेधार्थ धर्मा पाटील यांचा मुलगा मोबाइल टॉवर चढला होता. सरकारविरोधात तीव्र निषेध धर्मा पाटील यांच्या मुलाने केला आहे. तसेच स्वर्गीय धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

सरकारकडून मागणी पूर्ण न झाल्याने आणि मंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचे जे आश्वासन दिले होते ते देखील पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी हे अंदोलन आहे. नरेंद्र पाटील यांना खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर माझ्याकडेही आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पत्रही पाठवलं आहे.

COMMENTS