धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीतील 500 दिव्यांग, गरजू निराधारांना डॉ. संतोष मुंडेंच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीतील 500 दिव्यांग, गरजू निराधारांना डॉ. संतोष मुंडेंच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

परळी वैजनाथ – देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र थैमान घातले आहे. याच संकट काळात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीतील दिव्यांग, गरजू निराधारांना दिव्यांगाचे कैवारी तथा रा.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तुंचे सोशल डिस्टन्स नियम पाळून वाटप करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्यामुळे संकटात मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाँकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजुरी,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे. परळीतील दिव्यांग व गरजू निराधारांना धनंजय मुंडे हे मदतीला धावून आले आहेत. त्यांनी परळीतील 500 दिव्यांग व निराधार बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्स’ पाळून,मास्क बांधून व रितसर यादी तयार करून अपंगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. धनंजय मुंडे हे नेहमीच दिव्यांग, गरजू निराधारांच्या मदतीसाठी सरसावललेले असता त्यांनी कोरोनाच्या संकटामुळे संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना चार महिन्याचे वेतन बँक खात्यात जमा केले आहे. दिव्यांगा, गरजू निराधारांना संकटाच्या काळात मदतीचा हात मिळाला आहे.

 

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती गेल्या दोन महिन्यापासून आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहेत. अशात कुटुंबांचा ऊदरनीर्वाह तरी कसा करायचा असा एक प्रश्न दिव्यांग व गरजू निराधारांना समोर ऊभा झाल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग व गरजू निराधारांना जिवनावश्यक वस्तुचे वितरण करुन आधार दिला आहे. 500 जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 15 दिवस पुरेल एवढे साहित्य देण्यात आले आहे. यामध्ये साजन लोहिया, दत्ता मोरे, शेख फरजाना, शेख मुबारक, नारायण राऊत, नंदकुमार जोशी, विमल सुत्रावे, उध्दव फड, संजय नखाते, गोदावरी नखाते, पार्वती फड, सत्यप्रकाश काबरा, भोकरे संघपाल, राधाबाई सोळंके, अनंत लोखंडे, अनंत सौंदळे, पुष्पा सोळंके, गणेश शिवगण, विष्णू आघाव, तुळशिराम प्रयाग, सय्यद इजाज, शिवनांदी आळणे, विजय भोयटे, उमाकांत स्वामी, अलका भंडारी, शेख प्रविण, शेख चंदु, उषा जाधव, राम शेप, अंबिका कापसे, भास्कर देशमुख, राधेचा बी., प्रवीण अविनाश, राजेखान शेख, वच्छला सायकर, शोभा शिवगण, सरला वाल्मिकी, विजयीलक्ष्मी अन्नलदास, सय्यद सलीम, भीष्मा जाधव, रूपाबाई वाल्मिकी, मुंडे मामा, आकाश चव्हाण, शबाना मौनोदिन, बालाजी सुगरे, बालाजी उजगरे, शिवलीली यळंगे, मुक्तता माने यांच्यासह 500 दिव्यांग, निराधारांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संतोष मुंडे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे. दिव्यांग व निराधारांनी तसेच नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करावे, विनावश्यक कमाशिवाय बाहेर पडु नका, आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS