बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत मोठी बातमी,  पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली माहिती!

बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत मोठी बातमी, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली माहिती!

बीड – बीड जिल्ह्यातील सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत नोंद असलेल्या पात्र 13460 विद्यार्थ्यांपैकी 5601 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित केली असून उर्वरित 7859 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती येत्या 8 दिवसात वितरित होईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

केंद्रा सरकारच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यातील काही तांत्रिक त्रुटींमुळे शिष्यवृत्ती वितरित होण्यास विलंब होतो. यातील त्रुटी दूर करून 7859 विद्यार्थ्यांची प्रलंबित 15 कोटी 19 लाख रुपये शिष्यवृत्ती 8 ते 10 दिवसांच्या आत त्यांच्या संलग्न बँक खात्यात वितरित होणार आहेत.

पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची रक्कम संलग्न खात्यावर केंद्राच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आधारक्रमांक नोंदणी करणे, आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न नसणे, आधार क्रमांक इनऍक्टीव्ह असणे, व्हाउचर रिडीम न करणे, आधार संलग्न खाते बंद असणे, आधार व खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे, महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्ययावत करणे प्रलंबित असणे अशा काही त्रुटींमुळे शिष्यवृत्ती वितरणास विलंब होत असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी म्हणाले.

केंद्राकडे देशातील डीबीटी मार्फत च्या योजनांचे अर्ज येत असतात त्याची छाननी करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा अतिशय तोडकी असल्यामुळे या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यास विलंब होतो त्यात राज्य शासन नव्हे तर केंद्र शासनाची ही प्रणाली जबाबदार असते.

बीड जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष सन 2019 – 20 मध्ये अनुसूचित जातीच्या 16117 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती साठी अर्ज केले होते. त्यापैकी पात्र 14615 अर्जापैकी 13912 अर्ज महाविद्यालय स्तरावर मंजूर झाले. यातील 13460 अर्जाची 34 कोटी 16 लक्ष रुपये शिष्यवृत्ती विभागाला प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टलद्वारे याची देयके तयार करण्यात आली आहेत.

देयके तयार झालेल्या 13460 पैकी पीएफएमएस प्रणालीद्वारे 5601 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क अशा टप्प्यात एकूण 18 कोटी 97 लाख रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे.

तर पीएफएमएस प्रणालीतील विलंबामुळे 7859 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम 15 कोटी 19 लाख रुपये वितरणाची प्रक्रिया सुरू असून ती संबंधित विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या संलग्न बँक खात्यात 8 ते 10 दिवसांच्या आत जमा होतील.

विद्यार्थ्यांच्या आधार व अन्य तांत्रिक बाबींचे जसजसे निराकरण होत आहे त्यानुसार वितरण प्रक्रिया सुरू आहे व येत्या 8 दिवसात सर्व विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात शिष्यवृत्ती वितरित होईल असे डॉ. सचिन मडावी यांनीही सांगितले.

करोना आणि लॉक डाऊन मुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असतानाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रहावरून राज्यभरातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी ची रक्कम आठ दिवसांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली असून आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यातही पाठवण्यात आली आहे होणाऱ्या विलंबास राज्य शासन किंवा समाजकल्याण विभाग नव्हे तर केंद्राची प्रणाली जबाबदार आहे.

COMMENTS