माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला याचा आनंद वाटला – धनंजय मुंडे

माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला याचा आनंद वाटला – धनंजय मुंडे

मुंबई – आमच्यात संघर्ष झाला, कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. परंतु माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्व मतभेद विसरुन धनंजय मुंडे यांना कॉल केला होता. त्यावर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान मला कोरोना झाल्यानंतर पहिली काळजी हीच होती की कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसेल ना? मुली समजूतदार आहेत. त्यांनी समजून घेतलं. काम करणं हा बालपणापासूनचा स्वभाव आहे. होम क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर सामाजिक विभागाची कामं करायची आहेत.मानसिकदृष्ट्या खचू नका, गरज असेल तरच बाहेर पडा, स्वच्छता ठेवा असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

तसेच आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जेव्हा कळलं, तेव्हा आईचा चेहरा पहिल्यांदा समोर आला. माझी प्रकृती आता व्यवस्थित आहे. नियमाप्रमाणे होम क्वॉरन्टाईन आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे जीवन पुन्हा मिळालं. आता मी माझं आयुष्य जनतेच्या सेवेत घालवणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS