खूप दिवसांपासून ‘या’ मतदारसंघात येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली – धनंजय मुंडे

खूप दिवसांपासून ‘या’ मतदारसंघात येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली – धनंजय मुंडे

अकोला – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. खूप दिवसांपासुन माझी इच्छा होती या मतदारसंघात येतो आज आलो योग आला आहे. पिचडांनी जे केल त्याचा राग लोकांमध्ये दिसुन येतोय. जनता विरुध्द नेता अशी ही निवडणूक आहे. एखाद्या माणसाला पक्ष का सोडावा लागतो चाळीस वर्षे पिचडांना पवारांनी भरभरुन दिले. त्या पिचडांनी एकाचे दोन केले आणि दुसय्राने 15 कोटी केल्यामुळे पिचडांना पक्ष बदलायची वेळी येते. जे गेलेत त्यांची चव गेली आहे मोदींच्या लाटेत निवडुन यायचा प्रयत्न करतायेत. कारखाना पवारांनी दिला पवारांच्या स्वागताला तुमचा साधा एमडी पण गेला नाही. उद्या अफजल खान येताय असं मी म्हटलं नाही उध्दव ठाकरे म्हणालेत. असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे.

दरम्यान पिचड तुमचं इतकं काम मग गुजरातच्या शहाला इथं याव लागतं. 370 चा इथे काय सबंध 72 हजारांची मेगा भरती ही त्यांच्या पक्षासाठी होती तरुणांसाठी नव्हती अशी टीकाही मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री पारदर्शकतेचा दावा करतात. परंतु लाज वाटायला हवी मुख्यमंत्री खोटं सर्टफिकेट देतात. 90 हजार कोटीचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनी गिळले असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे. लोकसभेत बहुमत मिळुनही याला घेवु की त्याला घेवु तुमचं लक्ष विचलीत करण्यासाठीची ही खेळी आहे असंही धनजंय मुंडे म्हणाले आहेत.

COMMENTS