छगन भुजबळांबाबत धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास !

छगन भुजबळांबाबत धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळ येथील केईएम रुग्णालयात जाऊन  घेतली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी छगन भुजबळ हे येत्या सोमवारपासून राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केईएम रुग्णालयात भुजबळ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसोबत चर्चा करून  त्‍यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.

दरम्यान यावेळी भुजबळ यांना भेटण्यासाठी केईएम रुग्णालयात राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील आमदार अमरसिंह पंडित, नाशिकचे आमदार जयवंतराव जाधव व पदाधिका-यांनीही भेट घेतली आहे. भुजबळ पुढचे दोन दिवस रुग्‍णालयातच राहणार असून सोमवारी ते पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्‍त केला आहे.

COMMENTS