पाथरी – पीडित कुटुंबियांचं धनंजय मुंडेंकडून सांत्वन, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका!

पाथरी – पीडित कुटुंबियांचं धनंजय मुंडेंकडून सांत्वन, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका!

पाथरी – पाथरी तालुक्यातील मरडस गावं येथील तुकाराम काळे या शेतकऱ्याचा मागील आठवड्यात स्टेट बँकेच्या दारात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. काळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू अशा भावना मुंडेंनी यावेळी व्यक्त केल्या.

काही शेतकरी स्टेट बँकेकडे खरीप पिकासाठी कर्जाची मागणी करत होते. स्टेट बँकेने कर्ज मागणीवर कार्यवाही न केल्याने शेतकरी स्टेट बँकेच्या दारात निदर्शने करीत होते यावेळी तुकाराम काळे यांच्या अर्जावर कोणतीही कृती न झाल्याच्या धक्क्याने त्यांना प्राण गमवावा लागला. आज मुंडे यांनी काळे यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडले असून, फक्त भाषणात हे सरकार शेतकऱ्यांचा कैवार घेते मात्र वास्तवात हे सरकार शेतकऱ्यांचे वैरी आहेत. तेव्हा आगामी काळात शेतकरीच या सरकारला धडा शिकवतील अशा भावना याप्रसंगी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

COMMENTS