धनंजय मुंडेंनी  सांगतिलेली ही गोष्टी होतेय व्हायरल

धनंजय मुंडेंनी सांगतिलेली ही गोष्टी होतेय व्हायरल

बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने आरोप केल्यानंतर अडचणीत सापडले होते. दरम्यान, मुंडेंनी सोशल मिडियावर केलेल्या खुलाशानेतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी केलेल्या कोंडीमुळे त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात आल्याची चर्चा होती. पण काही दिवसात हे प्रकरण मिटल्याने मुंडेंना दिलासा मिळाला. शुक्रवारी परळीमध्ये झालेल्या पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. यात त्यांनी आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांचं अप्रत्यक्ष वर्णन करताना राजा आणि प्रधानाची सांगितलेली गोष्ट सगळ्यांचीच दाद मिळवून गेली. धनंजय मुंडेंनी त्यांच्याच शैलीत लगावलेले हे फटकारे बीडकरांसाठी मात्र विशेष ठरला.

यावेळी गोष्ट सांगताना धनंजय मुडे म्हणाले, ‘मला माझ्या आजीनं ही गोष्ट सांगितली होती. देव करतो ते भल्यासाठीच करतो. एक राजा असतो. दरबारात बसून तलवार पुसत असतो. राजाचा अंगठा तुटतो. ते बघताच प्रधान म्हणतात, राजे, देव करतो ते भल्यासाठी. राजाला राग आला. राजा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा ठोठावतो. त्यानंतर राजा शिकारीला निघतो. सोबत फौज होती. दाट जंगलात फौज मागे पडून राजा एकटाच पुढए गेला तेव्हा तिथल्या आदिमानवाने त्याला पकडलं. नरबळीसाठी राजाला नेण्यात आलं. पण एका वृद्धाला राजाला अंगठा नसल्याचं लक्षात आलं आणि तो म्हणाला की याला अंगठा नाही, त्यामुळे हा नरबळी चालणार नाही. राजाला सोडून देण्यात आलं. राजानं परत येऊन प्रधानाची सुटका केली. प्रधान राजाला म्हणतो, जे होतं ते भल्यासाठी होतं. जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता! म्हणून सांगतो संजय भाऊ (आमदार संजय दौंड), जे होतं, ते भल्यासाठी होतं.’

COMMENTS