भगवानबाबा यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते – धनंजय मुंडे

भगवानबाबा यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते – धनंजय मुंडे

वाशिम – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आज वाशिमच्या दौ-यावर होते. संत भगवानबाबा यांच्या जयंती निमित्त वाशिम येथे भगवान सेना आयोजित कार्यक्रमास आज त्यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला. भगवानबाबा यांचे कार्य एका समाजापूरते मर्यादित नव्हते तर त्यांनी सर्व समाजाला आध्यात्माच्या मार्गाने सदवर्तनाची शिकवण दिली. ती शिकवण आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे असं आवाहन यावेळी मुंडे यांनी केलं. तसेच भगवानबाबांनी भक्ती, कर्म आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला.या तीन मार्गाने जीवनात चालत राहिलं तर जीवनाचं सार्थक होईल ही शिकवण अंगीकारावी असं आवाहनही यावेळी मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान समाजाला भक्ति मार्गाला लाऊन, समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यातून बाहेर काढत ज्ञान, कर्म मार्गाची शिकवण राष्ट्रसंत श्री भगवानबाबा यांनी दिली असल्याचंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS