‘जनता कर्फ्यु’ मध्ये धनंजय मुंडेंचे वर्क फ्रॉम होम; प्रशासकीय यंत्रणेचे मानले आभार, धाकट्या लेकीलाही दिला वेळ!

‘जनता कर्फ्यु’ मध्ये धनंजय मुंडेंचे वर्क फ्रॉम होम; प्रशासकीय यंत्रणेचे मानले आभार, धाकट्या लेकीलाही दिला वेळ!

परळी – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यु’मध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हेही सहभागी झाले होते. आजचा दिवस त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आपल्या परळी येथील निवासस्थानी वेळ घालवला.

सकाळी ७.०० पासून रात्री ९.०० पर्यंत सुरू असलेल्या या कर्फ्युमध्ये धनंजय मुंडे यांनी काही प्रलंबित कामे घरबसल्या मार्गी लावतच काही पुस्तकांचे वाचन केले. तसेच लाडकी लेक आदिश्रीलाही बराच वेळ दिला. याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान आज भारतीयांनी एकजूट होऊन कोरोनावर मात करण्याची ताकद दाखवली. आपल्या आरोग्यासाठी झटणारे सर्व डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना अनोखी मानवंदना दिली. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज आहेत. असे म्हणत मुंडेंनी एक लहान मूल घरात थाळी वाजवत असलेला व्हीडिओ शेअर केला आहे.

आज देशभरात सायंकाळी 5 च्या दरम्यान प्रशासकीय यंत्रणांचे आपापल्या घरात, गॅलरीत, व्हरांड्यात टाळी – थाळी वाजवून आभार मानण्यात आले.

‘त्या’ कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

बीडमधील नियंत्रण कक्षात सतर्कतेने कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ५०शिक्षकांचे ना. मुंडेंनी विशेष कौतुक केले आहे. स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घेत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याची आपुलकीने चौकशी करत जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्याचे महत्वाचे कार्य ते करत आहेत. स्वास्थ रक्षकांना सलाम! असे ट्विट करत ना. मुंडेंनी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व कर्फ्यु १००% यशस्वी केलेल्या जिल्हावासीयांचे कौतुक करत आभारही मानले आहेत.

दरम्यान कर्फ्युच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य विभाग आदी सर्वांशी सातत्याने संपर्क करून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच परळी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांकडूनही जागोजागच्या परिस्थितीची माहिती घेतली.

*लाडक्या लेकीला दिला वेळ*

सतत लोकांच्या गराड्यात राहणारे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर वरून आज आपली धाकटी लेक ‘आदिश्री’ हिच्या सोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. बऱ्याच दिवसांनी आदीश्रीला व त्यांच्या आई (बाई) यांनाही निवांत वेळ देता आला असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

पायाच्या बोटाला झालेल्या छोटयाशा दुखापतीमुळे दररोज नियमित व्यायाम करणारे धनंजय मुंडे यांनी आज प्राणायाम केले. दैनंदिन वृत्तपत्रांसह काही पुस्तकेही चाळली.

देशभरात पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युला बीड जिल्ह्यात १००% प्रतिसाद मिळाला असून कोरोना विषाणूला थोपणवण्याची लहान थोरांनी एकजूट केली असून आपण सर्वजण मिळून कोरोनाला हरवणारच असा विश्वास व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा शासकीय सूचनांचे पालन करत पुढील काही दिवस अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्लाही जिल्हावासीयांना दिला आहे.

जगमित्र कार्यालय पहिल्यांदाच बंद!

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचे परळी येथील ‘जगमित्र’ हे संपर्क कार्यालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. कार्यालयाच्या स्थापनेपासून बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे! नागरिकांना अत्यंत महत्वाचे काही काम असल्यास त्यांनी व्हाट्सअपच्या किंवा ई-मेलच्या माध्यमातून संपर्क करावा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS