सभागृहात गोंधळ घालणाय्रा  भाजपच्या आमदाराला धनंजय मुंडे म्हणाले…”ओ दाजी आपण जरा बसा !”

सभागृहात गोंधळ घालणाय्रा भाजपच्या आमदाराला धनंजय मुंडे म्हणाले…”ओ दाजी आपण जरा बसा !”

नागपूर – राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आज सभागृहात चांगलेच संतापले असल्याचे पहावयास मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. फडणवीस यांनी ‘सामना’मधील लेखांचा संदर्भ देत पवार यांच्यावर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पवारांचा उल्लेख असणारे वक्तव्य रेकॉर्डवरुन काढण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी त्या गोंधळ घालणाऱ्या आमदारांपैकी एकाकडे हात करत “आपण जरा बसा… ओ दाजी.. ओ दाजी.. बसा..” असा आवाज दिला.

दरम्यान विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना
फडणवीस यांनी ‘सामाना’मधील संदर्भ देत जुन्या बातम्यांचे मथळे वाचून दाखवले शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू, असा मथळा फडणवीस यांनी वाचल्यावर सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. त्यानंतर सभागृहामधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आरडाओरड आणि गोंधळ सुरु केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची विनंती केली.

तसेच विरोधी पक्ष नेता म्हणून मी विधान परिषदेमध्ये वर्तमानपत्राचा संदर्भ देत असताना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तमानपत्र वाचून त्याचा आधार दोन्हीही सदनामध्ये घेता येत नसल्याचं म्हटलं होतं” त्यामुळे त्यांनाही आता सभागृहात वर्तमानपत्र वाचता येणार नाही. असं धनंजय मुंडे म्हणाले, मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाच्या काही आमदारांनी मुंडे यांच्या या वक्तव्याचा विरोध केला. त्यावेळी संतापलेल्या मुंडे यांनी त्या गोंधळ घालणाऱ्या आमदारांपैकी एकाकडे हात करत “आपण जरा बसा… ओ दाजी.. ओ दाजी.. बसा..” असा आवाज दिला. परंतु मुंडे यांनी दाजी म्हणत कोणत्या आमदाराला हाक मारली हे समजलं नाही.

COMMENTS