धनंजय मुंडेंचा आणखी एक धक्का, ‘या’ नेत्याचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश !

धनंजय मुंडेंचा आणखी एक धक्का, ‘या’ नेत्याचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश !

अंबाजोगाई – शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईच्या जाहीर सभेत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज, मराठा समाज आणि विनायक मेटेंची भाजपा सरकारने कायम उपेक्षा केल्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आपण व आपले कार्यकर्ते परीश्रम घेतील असे तुळशीराम पवार म्हणाले.

पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी पवार व त्यांचे सहकारी यांना पक्षाचा गमजा देवून स्वागत केले. यावेळी त्यांच्यासह शिवसंग्रामचे परळी शहराध्यक्ष देवराव कदम, सरचिटणीस उत्तमअण्णा कदम, सिरसाळा अध्यक्ष राजुभाई सय्यद, युवक तालुकाध्यक्ष कैलास पोपळघट, सिरसाळा सर्कलप्रमुख विकास जाधव, उध्दव देशमुख, तन्वीर भाई, शहरउपाध्यक्ष शेख मुजीब पठाण, महेबूब भाई, दादाहरी वडगावचे संदीपान शिंदे, दिनेश कापसे, नागनाथ निकम, शेख शौकत, माऊली कांडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

शिवसंग्रामने कायम मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुबईतील आंतरराष्ट्रीय स्मारक यासाठी लढा दिला आहे. मात्र या सरकारला अद्यापही स्मारक उभे करता आले नाही. मराठा आरक्षण हे सरकारने दिलेले नसून मराठा समाजाच्या आंदोलनामुळे ते मिळाले आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी भाजपाला प्रामाणिक साथ देवूनही त्यांची कायम उपेक्षा केली.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मेटे यांच्या सोबत सापत्न वागणूक देवून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मेटे यांच्याबद्दल आपल्याला कायम आदर असला तरी स्थानीक राजकारण व भाजपाकडून होणारी कूचंबना यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे सांगून उद्याच्या परळीच्या सभेत अधिक स्पष्ट सांगू असे त्यांनी सांगीतले.

COMMENTS