धनंजय मुंडेंना आवरला नाही बुलेटचा मोह, कार्यकर्त्यांसोबत भर उन्हात घेतला रॅलीत सहभाग !

धनंजय मुंडेंना आवरला नाही बुलेटचा मोह, कार्यकर्त्यांसोबत भर उन्हात घेतला रॅलीत सहभाग !

अंबाजोगाई – राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले धनंजय मुंडे राज्यातील राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेसच्या आणि आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी हेलीकॉप्टरने राज्यभरात फिरत असले तरी आपल्या मतदारसंघात फिरतांना त्यांनी चक्क बुलेटवरून प्रचार केला. त्यामुळे आपण राज्यभर हेलीकॉप्टरने प्रचार करीत असलो तरी मतदारसंघात मात्र आपण जमीनीवरच चालतो, हे त्यांनी दाखवुन दिले आहे.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आज तालुक्यातील राडी येथे प्रचारसभेला जातांना अंबाजोगाई कारखान्यापासुन युवक कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांमध्ये क्रेझ असलेल्या बुलेटची संख्या होती. धनंजय मुंंडे यांचेही बुलेटप्रेम सर्वश्रुत असल्यामुळे रॅलीची सुरूवात होताच त्यांनाही बुलेटवर बसण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी चक्क एका कार्यकर्त्याची बुलेट आपल्या हाती घेत रॅलीचे नेतृत्व केले. युवकांचे आयकॉन असलेले धनंजय मुंडे स्वतःच रॅलीत उतरल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीने वाढला.

राडीपर्यंत बुलेट चालवुन रस्त्यावरील मतदारांना धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहनही केले. धनंजय मुंडे यांच्या बुलेट रॅलीची मतदारसंघात चांगलीच चर्चा होत आहे.

COMMENTS