त्यांना कोणी तरी हे बीड नाही याची आठवण करून द्या – धनंजय मुंडे

त्यांना कोणी तरी हे बीड नाही याची आठवण करून द्या – धनंजय मुंडे

पाथर्डी – दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे आयोजित सभेत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट विखे कुटुंबावर सवाल उपस्थित करत सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. “मी १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले माझा अनुभव कमी असताना मी हे विधानपरिषदेत केले मग विधानसभेत विखे पाटलांना का जमले नाही ? डाल मैं कुछ काला है !” असा टोला त्यांनी लगावला.

देश विकासावर चर्चा करण्याची मागणी करत असताना मोदी मात्र काँग्रेस आणि आदरणीय पवार साहेबांवर टीका करण्यात मग्न आहेत. काँग्रेसने काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी तपासून घ्यावे की ते ज्या शाळेत शिकले ती शाळा कोणी बांधली ? असा प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी सुजय विखेंवर जोरदार हल्ला चढवला. संग्राम यांच्या प्रचारासाठी त्यांचे आईवडील उजळ माथ्याने फिरत आहेत तर ‘कु जय यांच्यामुळे त्यांच्या आईवडीलांना नगरमध्ये फिरता येत नाही असा टोला लगावला.

पंकजाताई विखे यांचा प्रचार कमी आणि माझ्यावरच जास्त टीका करत आहेत. त्यांना कोणी तरी हे बीड नाही याची आठवण करून द्या असा टोला लगावला.

राज्यात नवीन बहिणभावाची जोडी पहायला मिळत आहे. बीडच्या पालकमंत्री पायाला भिंगरी लावून इथे फिरत आहेत. मद्यनिर्मितीच्या नात्याने हे दोघे एकत्र आले असावेत. सुजय म्हणतात ऊसतोड कामगारांसाठी आम्ही एकत्र आलो. ऊसतोड कामगारांचा पुळका यांना कधीपासून आला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंकजाताई मुंडे ह्या स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पोटी जन्माला आल्या असल्या पण मी सावलीसारखा स्व. मुंडेंसोबत राहिलो आहे. त्या स्वतःला स्व. मुंडे साहेबांच्या वारस म्हणत आहेत पण यांनी पाच वर्षे पाथर्डीसाठी काय केलं ? हे ऊसतोड कामगारांचा कलंक पूसू शकले नाही तर हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न कसे साकार करणार ? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाथर्डीकरांनी अनेकवेळा नातीचं ऐकलं आता नाताचं ऐका आणि संग्राम भैयांना निवडून आणा नगरचे नाव देशात नाव रुपाला येईल असे आवाहनही त्यांनी पाथर्डीच्या जनतेला केले

या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, उमेदवार संग्राम जगताप, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र फाळके , सोमनाथ धुत, दादासाहेब मुंडे, राजाभाऊ दौड आदी उपस्थित होते.

COMMENTS