धनंजय मुंडेंकडून भाऊबिजेच्या शुभेच्छा, म्हणाले…

धनंजय मुंडेंकडून भाऊबिजेच्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत ट्वीट मुंडे यांनी केलं असून “जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! मुंडेंनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान काल धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटरद्वारे शेअर केला. सुप्रिया सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करताना मुंडेंनी मानलेलं जरी असलं. तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं. बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं! उद्या भाऊबीज व आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं सुद्धा कठीण आहे. असं म्हटलं होतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या व बहीण पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी परभाव केला आहे.

या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी दिवाळी अथवा विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या का? याबाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले, “शुभेच्छा त्यांच्याकडून मला यायला पाहिजे. मी त्यादिवशी तुम्हाला जे सांगितलं त्यांना तसे आजही तेच वाटतंय. हे शेवटी या निवडणुकीमध्ये भावाची आणि बहिणीची ही निवडणूक जरी आपण सगळे म्हणतात तरी ती दोन पक्षाच्या उमेदवारांची निवड होती. दोन पक्षांच्या विचारांची निवडणूक होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्ष हरला. त्यांचा विचार हरला. आमचा पक्ष जिंकला. आमचा विचार जिंकला. राहिला विषय बहीण-भावाच्या नात्यांचा तर मी मोठा आहे. नक्कीच विजयाचा आनंद आहे. पण कुठेतरी दुःख आहे. शल्य आहे की शेवटी घरातलाच एक व्यक्ती  या निवडणुकीत आपल्याकडून पराभूत झाला. त्यामुळे जे माझं मत होतं ते स्वाभाविक आहे. घरातला मोठा म्हणून या ठिकाणी आपल्यावर ती जबाबदारी आपण पार पडतोय. म्हणून ते दुःख शल्य मनामध्ये होतं आजही आहे. राहिला विषय मी शुभेच्छा द्यायचा तर  निवडणूक मी जिंकलो. शुभेच्छा मला यायला पाहिजे होत्या. पण ठीक आहे. आपण समजून घेऊ शकतो. तसं काय आमच्यामध्ये अनेक दिवसांमध्ये संवाद नाही.  पुढे कुठले संवादाची अपेक्षा माझ्यासारख्यांनी ठेवू नये. तेही उचित नाही. माझ्यासारख्याने संवाद केला तर त्या संवादाचा सन्मान होईल किंवा मान ठेवला जाईल असे माझ्यासारख्याला पूर्वीचा अनुभव लक्षात घेता आज वाटत नाही. तो काय आता आमचा विषय राहिला नाही, असं मुंडे यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज भाऊबिजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! असं म्हटलं आहे.

COMMENTS