बीड जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलैपर्यंत मुदतवाढ !

बीड जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलैपर्यंत मुदतवाढ !

बीड – जिल्ह्यात 2019-20 मध्ये आतापर्यंतची विक्रमी ८० हजार ४९९ शेतकऱ्यांच्या २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापसाची
खरेदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत शेतकर्‍यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे काळजी घेऊन पावसाळा सुरु झाल्यानंतर देखील वाढीव मुदत देण्यात आली होती. बीड जिल्ह्याची कापूस खरेदी प्रक्रिया 23 जुलै 2020 रोजी मुदतीअखेर पूर्ण करण्यात आली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार जिल्ह्यात जास्त संख्येने ग्रेडर नियुक्त करण्यात आले आणि खरेदी प्रक्रिया करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 24 हजार 921 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तसेच नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 ते 3 जून 2020 या कालावधीत नोंदणीची संधी देण्यात आली होती. त्या कालावधीत 3365 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अशी एकूण 28 हजार 286 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शिवाजी बडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत कॉटन फेडरेशनने एकूण 14 खरेदी केंद्रावर 26 जिनिंग फॅक्टरी मध्ये व सी.सी.आय एकूण 2 खरेदी केंद्रावर 10 जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी केलीे

कापूस खरेदी केंद्रावरील वाहनांची गर्दी कमी करणे, खरेदी सुरळीतपणे होणे, शेतकऱ्यांना केंद्रावर जास्त दिवस ताटकळत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांचे मार्फत उपाय योजना राबविण्यात येऊन 5 ते 13 मार्च 2020 या कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी करण्यात आली होती

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 19 जून 2020 आदेशाने नोंदणी केलेल्या व अद्याप कापूस विक्रीसाठी न दिलेल्या 12 हजार 413 शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष कापूस शिल्लक पाहणी साठी तलाठी , ग्रामसेवक यांचेमार्फत पंचनामे करण्यात आले त्यात 3407 शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यात आढळून आले होता

सर्व बाजार समित्यांनी त्यांच्याकडे नोंदणी झालेल्या व शिल्लक कापूस आढळून आलेला सर्व शेतकऱ्यांना मेसेज दिलेले आहेत. व त्यांना देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत त्यांच्याकडील कापूस खरेदीसाठी टोकन देऊन त्यांचे कडील कापूस खरेदी करण्यात आला, बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना दिलेली मुदत संपली.

यापुढे कापूस विक्रीसाठी शेतकरी शिल्लक नाहीत, असे कळविले आहे. व त्यानुषंगाने जिल्ह्यातील कॉटन फेडरेशनच्या सर्व कापूस खरेदी केंद्रांत 23
जुलै 2020 पासून खरेदी पूर्ण केलीे. प्र. विभागीय व्यवस्थापक,दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी वै. जिल्हा बीड यांनी हंगाम 2019-2020 मधील covid-19 चे प्रादुर्भाव नंतरची शासकीय कापूस खरेदी चे कामकाज संपुष्टात आल्याचा नोंद घेण्यात आलेली असून,

बीड जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी 23 जूलै 2020 पासून बंद ठेवण्यात येत असून त्यास परवानगी देणेबाबत 21जुलै 2020 रोजीच्या पत्रान्वये मा. जिल्हाधिकारी, बीड यांना विनंती केलेली आहे. तसेच केंद्र प्रभारी, भारतीय कपास निगम लि. केंद्र, बीड यांनी 18 जुलै 2020 रोजी पर्यंत तर केंद्र प्रभारी, भारतीय कपास निगम लिमिटेड केंद्र गेवराई यांनी दि.14 जुलै रोजी पर्यंत शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करण्यात आला

प्राथमिक नोंदणी केलेल्या एकूण 28 हजार 286 शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष कापूस शिल्लक असल्याचे आढळून आलेल्या आणि अद्याप कापूस खरेदी बाकी असलेल्या सर्व 3080 शेतकऱ्यांना कापूस केंद्रावर आणण्यासाठी संदेश देण्यात आले होते

कापूस विक्रीसाठी आणण्यासाठीच्या बाजार समिती मार्फत देण्यात आलेल्या 23 जुलै 2020 रोजी अखेर मुदत पूर्ण झाली असल्याने प्र. विभागीय व्यवस्थापक,दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, विभागीय कार्यालय परळी-वैद्यनाथ जिल्हा बीड व केंद्र प्रभारी, सी.सी.आय. बीड /गेवराई यांनी ते या हंगामातील कापूस खरेदी बंद करण्यात येत असल्याचे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीना कळविले.

COMMENTS