विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही  करणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा, बारामतीमधून करणार सुरुवात !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही करणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा, बारामतीमधून करणार सुरुवात !

मुंबई – राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील शेतकय्रांचे मोठे नुकसान झाल्यामुळे या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. पवार हे
मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत.18 आणि 19 ऑक्टोबररोजी ते मराठवाड्यात असणार आहेत. यावेळी ते
उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देणार आहेत.

पवार यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या काळात ते दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून सुरुवात होणार आहे.

असा असणार फडणवीसांचा दौरा

फडणवीस हे 19 ऑक्टोबरला बारामतीमधून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या परिसराची पाहणी करणार आहेत. याच दिवशी ते पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 तारखेला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार. तर शेवटच्या दिवशी ते 21 जालना, हिंगोली आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. त्यामुळे या दौय्रानंतर ते शेतकय्रांसाठी काय मागणी करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS