…त्यामुळे कोर्टही हे प्रतिज्ञापत्रक स्वीकारणार नाही, अजित पवारांच्या क्लीन चिटला फडणवीसांचा विरोध!

…त्यामुळे कोर्टही हे प्रतिज्ञापत्रक स्वीकारणार नाही, अजित पवारांच्या क्लीन चिटला फडणवीसांचा विरोध!

नागपूर – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवारांचा सिंचन घोटाळ्याशी थेट संबध जोडता येणार नसल्याचं अँटी करप्शन ब्युरोने हायकोर्टात म्हटलं आहे. यावर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसीबीने कोर्टात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसेच सिंचन घोटाळ्यात मंत्र्यांकडून सर्व जबाबदारी काढून अधिकाऱ्यांवर घोटाळ्याची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न होत आहे. 2018 चा निर्णय खोडून काढणारा एकही पुरावा आज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे कोर्टही हे प्रतिज्ञापत्रक स्वीकारणार नाही. आम्ही काही प्रमाणात सभागृहातही हा मुद्दा उचलणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. यामध्ये विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांतील सर्वच प्रकरणांत अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. नागपूर खंडपीठात एसीबीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना पूर्णपणे क्लीनचिट देण्यात आल्याने याप्रकरणी आता अजित पवार यांच्याविरोधात केस चालणार नाही. अजित पवार यांच्यासह हा राष्ट्रवादीला मोठा दिलासा असणार आहे.

COMMENTS