कोल्हापूरात फडणवीसांच्या भेटीगाठी

कोल्हापूरात फडणवीसांच्या भेटीगाठी

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने त्यांच्या भेटीला अनेक नेते मंडळी आली होती. दरम्यान, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे व विनय कोरे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहेत. तसेच माजी खासदार धनंजय महाडीक व पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनीही फडणवीसांची भेट घेती.

केंद्र शासनाने कृषी कायदे केले असून, त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजपा किसान सभा व रयत क्रांती संघटनेच्यावतीने आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी येत आहेत. तेथील सभा संपल्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यात आले. त्यांनी नसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीसाठी वारणानगर येथे गेले. आमदार कोरे यांच्या आई सावित्रीबाई कोरे यांचे अलिकडेच निधन झाले होते. फडणवीस सात्वंनपर भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यानंतर ते तेथून इचलकरंजी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना भेटणार आहेत. त्यांच्या पत्नी इंदुमती आवाडे यांचे अलिकडे निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भेटणार आहेत. तसेच यावेळी ते कल्लाप्पा आवाडे यांना व भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेतली.

दरम्यान, कोरे व आवाडे या दोघांच्या भेटीनंतर माजी खासदार धनंजय महाडिक व संग्राम देशमुख यांचीही भेट घेतली. कोल्हापूर महापालिका, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा महत्त्वाच्या निवडणूका नजिकच्या काळात होणार असून, जिल्ह्यातील हे दोन नेते भाजपासोबत असणे ही भाजपाची गरज आहे. त्यामुळे हे बेरजेचे राजकारण करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

COMMENTS