राज्यपाल आमदारांची नियुक्ती का करतं नाय ; अजितदादा संतापले

राज्यपाल आमदारांची नियुक्ती का करतं नाय ; अजितदादा संतापले

पुणे : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने एकमताने ठऱाव करून तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सही करूनही राज्यपाल आमदारांची नियुक्ती करीत नाही. ते हा का करीत नाही. हे पाहावे लागेल, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. महाविकास आघाडीच्यावतीने प्रत्येक पक्षाच्या वतीने चार अशी एकूण १२ नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आले. मात्र, राज्यपाल यावर निर्णय घेत नाहीत,

अजित पवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

COMMENTS