नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय – केसरकर

नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय – केसरकर

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांना खाजवून खरुज काढण्याची सवय असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे. चिपी विमानतळावर आज पहिलं विमान उतरलं. हे विमान उतरुन अवघे काही तास लोटले असतानाच यावर आता राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. दुस-याच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे त्यात मीठ कशाला कालवता असा सवाल केसरकर यांनी राणेंना केला आहे.

दरम्यान चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केसरकर यांच्यावर केला आहे. विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही केसरकर यांनी विमान उतरवल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. तसेच केसरकर यांनी खासगी कंपनीला दहा लाख रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने चिपीत विमान उतरवलं असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राणे यांना केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून या विमानतळासाठी जेंव्हा जिमिनी घेतल्या गेल्या तेव्हा कवडीमोलाने जमिनी कोणी घेतल्या? तसेच या विमानतळाला खडी सप्लाय कोणी केला? याचा शोध घ्या. हे सगळं राणेंच्या लोकांनीच केलं असल्याचा आरोप केसरकर यांनी केला आहे.

COMMENTS