कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मृत्यू!

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मृत्यू!

सोलापूर – राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनामुळे काही राजकीय नेत्यांचा बळी देखील गेला आहे. सोलापूरमध्ये एका माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माजी आमदार युनूस शेख यांचा शनिवारीच कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरु होते परंतु उपचारादरम्यानच त्यांचा आज मृत्यू झाला आहे.त्यांच्या पश्‍चात 4 मुले, 3 मुली असा परिवार आहे.

दरम्यान युनूस भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते.शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जात. 1969, 1975 आणि 1985 अशा तीन टर्मला ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना महापौर पदासाठी संधी दिली होती. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1990 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

COMMENTS