ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील शाळा, कॉलेजला उद्या सुट्टी, मुंबई पालिकाही अलर्टवर !

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील शाळा, कॉलेजला उद्या सुट्टी, मुंबई पालिकाही अलर्टवर !

राज्यातील किनारपट्टी भागातील शाळा-महाविद्यालयांना खबरदारीच्या उपाययोजना म्हणून उद्या सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना ही सुट्टी देण्यात आलीय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढील 24 तास राहणार असून किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासंह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवरच शालेय आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीेने शालेय शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही अलर्टवर आहे. दक्षतेसाठी दादर चौपाटीवर जाणारे ६ मार्ग केले बंद केले आहेत. दादर चौपाटीवरील सर्व दुकाने हटवली आहेत. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनाही दादर चौपाटीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र चैत्यभूमीवर जाण्यास परवानगी आहे.  ओखी वादळ आणि पावसामुळं परिस्थिती बिकट झाल्यास मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांची ७० शाळांमध्ये निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफसह मुंबई महापालिकेचा आप्तकालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहेत.

COMMENTS