शरद पवारांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का

शरद पवारांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का

मुंबई – राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या नाद हे सरकार पडणार अशी वलग्ना वारंवार भाजपच्या नेत्याकंडून केली जात आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहननंतर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना धक्का बसला आहे.

राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

COMMENTS