भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार?

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार?

मुंबई – राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर आता इतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा आणि आमदारांचा जयपूरमधल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या घडामोडींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरला पाठवले आहे तर शिवसेनेने देखील आपले सर्व आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून आमदारांना फोडण्यासाठी ५० कोटीची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर भविष्यात असा कुठलाही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आज काँग्रेस शिवसेनेला जवळ करु शकते अशी चर्चा सुरु आहे.

COMMENTS