काँग्रेसला फक्त ‘डील’च्या व्यवहाराची चिंता – पंतप्रधान मोदी

काँग्रेसला फक्त ‘डील’च्या व्यवहाराची चिंता – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली –  ‘काँग्रेसला दिल किंवा दलितांची नव्हे, तर केवळ डिलची चिंता असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती. ती दलितवालीही नव्हती. केवळ डीलवाली होती, त्यामुळे आता काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, तसेच ‘जो पक्ष गरिबांचं ‘वेल्फेअर’ करू शकत नाही, त्या पक्षाला जनतेने ‘फेअर वेल’ दिला पाहिजे,’ असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला आहे. ‘ज्यांची जयंती साजरी करायला हवी, त्यांची जयंती काँग्रेस पक्ष साजरी करत नाही. वीरा मरकडी यांना काँग्रेस विसरली असून मतांसाठी सुलतानांची जयंती साजरी करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘दलित आईच्या पोटी जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांना मी वंदन करतो. त्यांच्याकडून आपण शौर्य आणि साहस शिकायला हवं, असंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे. भाजपा लोकांच्या भावना समजून घेतं, आमचं सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, मी दलितांच्या विकासाबाबत विचार करतो. तुमच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी मी कटिबद्द असेल असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS