या मतदारसंघात आघाडीत होणार मैत्रिपूर्ण लढत!

या मतदारसंघात आघाडीत होणार मैत्रिपूर्ण लढत!

गडचिरोली – अहेरी मतदारसंघात आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघात सध्या गोंधळाची स्थिती असून आघाडीच्या घटक पक्षांपैकी दोन्ही पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत. काल रात्रीच्या काँग्रेसच्या यादीत माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताज्या यादीतही दिग्गज नेते -माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे महाराष्ट्रातील या एकाच मतदारसंघात आघाडीचे घटक पक्ष मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचे चित्र आहे.

तसेच भाजपने दुसऱ्या यादीत विद्यमान आमदार अंबरीश राजे आत्राम यांनाही याठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अहेरी क्षेत्रात तीन आत्राम आमदारकीसाठी झुंजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS