काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची दिल्लीत बैठक, लोकसभेसाठी ‘या’ उमेदवारांची नावं निश्चित ?

काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची दिल्लीत बैठक, लोकसभेसाठी ‘या’ उमेदवारांची नावं निश्चित ?

नवी दिल्ली – लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटीची बैठक आज पार पडणार आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या वाट्याच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे आधीच निश्चित झाली आहेत. यामध्ये सोलापूर – सुशीलकुमार शिंदे, नांदेड – अमिता चव्हाण, दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. तसेच काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे याबाबत आज कोणत्याही एका उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS