काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण राहणार?, पक्ष समितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?, वाचा सविस्तर!

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण राहणार?, पक्ष समितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?, वाचा सविस्तर!

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत लवकरच काँग्रेसचे अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी २ महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. तसेच सोनिया गांधी या संघटनात्मक निर्णय घेतील, हा देखील निर्णय घेण्यात आला. सोनिया गांधी यांना मदत करण्याकरिता चार सदस्य पॅनल तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. सीडब्ल्यूसीनेही या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. तर सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदी पुढे रहायचे नसल्याची भूमिका मांडली आहे. तसेच या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राबाबत सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. पत्राच्या मुद्द्यावरून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते काय म्हणालेत पत्रात?

गेल्या सहा वर्षांमध्ये पक्षाची सतत पडझड होत असल्याची नोंद घेत 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याची गरज या नेत्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट आहे, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा असेल किंवा राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा असल्याचं या पत्राच म्हटलं आहे.

हे पत्र पंधरा दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले असून त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपिंदर सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, विवेक टंका, पृथ्वीराज चव्हाण, पी.जे. कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित या नेत्यांच्या सह्या आहेत. या पत्रानंतर आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.

COMMENTS