“नवनीत राणा भाजपात पळाल्या”,काँग्रेसच्या ‘महापर्दाफाश’ सभेत गोंधळ!

“नवनीत राणा भाजपात पळाल्या”,काँग्रेसच्या ‘महापर्दाफाश’ सभेत गोंधळ!

अमरावती – काँग्रेसच्या महापर्दाफाश सभेत आज चांगलाच गोंधळ उडाला असल्याचं पहावयास मिळाले. अमरावतीमध्ये काँग्रेसची आज ‘महापर्दाफाश’ सभा पार पडली. या सभेदरम्यान खासदार नवणीत राणा यांचे नाव घेता चांगलाच गोंधळ उडाला होता. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार असं म्हणताच सभेत चांगलाच गोंधळ सुरू झाला. त्यामुळे काही काळ माणीकराव ठाकरे यांना आपलं भाषण देखील थांबवावं लागलं.

दरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच माणिकराव ठाकरे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो, असे म्हणाले. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांना थांबवले. ठाकूर यांनी ठाकरेंना नवनीत राणा यांचे नाव का घेता? त्यांनी दगा दिला, असं म्हणाल्या त्यानंतर गर्दीतून नवनीत राणा या भाजपत पळाल्या, अशी आरडाओरड सुरू झाली. त्यानंतर लगेच ठाकरे यांनी थेट भाजप सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते शांत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS