लोकसभेसाठी काँग्रेसची आठवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील एका उमेदवाराचा समावेश !

लोकसभेसाठी काँग्रेसची आठवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील एका उमेदवाराचा समावेश !

नवी दिल्ली – काँग्रेसनं लोकसभेसाठी आठवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ऩांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण लढणार की त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण लढणार याबाबत उत्सुकता होती. मात्र अखरे काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाण यांनाच रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने नांदेडमधून अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक आणि लोहाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरवलं आहे.

महाराष्ट्रातून अजून पुणे, हिंगोली, मुबंई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. राजीव सातव हे हिंगोलीचे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी असल्यामुळे त्यांना हिंगोलीतून निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे काँग्रेस आता इथे काय निर्णय घेते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे पुण्यातही काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नाही. त्यामुळे तिथला निर्णय लांबवणीवर पडला आहे. मुबंई उत्तर पश्चिम मधून मुबंईचे अध्यक्ष संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते ते पहावं लागेल.

COMMENTS