त्यामुळेच पवारांचे विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडतायत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे गंभीर आरोप !

त्यामुळेच पवारांचे विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडतायत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे गंभीर आरोप !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडार या दोन्ही पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव निलंगेकर यांनी राष्ट्रवादीच्या पडझडीवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना माझं सरकार शरद पवारांनी पाडलं होतं. त्यामुळेच पवारांचे विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडून सेना-भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्यासारख्या काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना पवारांमुळे राजकीय त्रास सहन करावा लागला. त्याकाळी माझं सरकार राज्यात मजबूतपणे काम करत होतं. महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. पण शरद पवारांनी याच भीतीने माझ्याविरोधात कुठलेच ठोस पुरावे नसताना माझ्या मुलीच्या गुणवाढ प्रकरणात मला संगनमत करून अडकवलं. याप्रकरणी पवारांच्या दबावामुळेच मला राजीनामा द्यावा लागला असा आरोपही त्यांनी केला.

तसेच शरद पवार काँग्रेस सोडून गेल्यानंतर माझ्यासह जो त्रास काँग्रेसच्या नेत्यांना झाला तोच त्रास आज पवारांना होत असेल असही निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते लातूरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

COMMENTS