…तर सरकारमधून बाहेर पडणार, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य!

…तर सरकारमधून बाहेर पडणार, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य!

मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.त्यामुळे काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे.

अशातच काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गांधी घराण्यानेच नेतृत्त्व करावे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी हे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे. मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता.  उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की, सरकारमधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू’ असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे, त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता आहे. आमच्या इथे भाजप पक्षासारखी हुकुमशाही नाही. जे दोन व्यक्ती निर्णय घेतील ते स्वीकारावे लागेल’, असा टोलाही वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही’, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे.

COMMENTS