काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याचे चिरंजीव बंडाच्या तयारीत !

काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याचे चिरंजीव बंडाच्या तयारीत !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षात बंडाची ठिणगी पडणार असून माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे चिरंजीव भरत गावीत हे बंडाच्या तयारीत आहेत. गावीत हे 30 मार्च रोजी नवापूर येथे समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यादरम्यान ते याबाबतची घोषणा करतील अशी माहिती आहे.

दरम्यान या जिल्ह्यात माणिकराव गावीत यांची नयमोठी राजकीय ताकद आहे. सलग नऊ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे याठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क असून
भरत गावीत यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांच्या बरोबरच भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना देखील मोठे आव्हान उभे राहणार असल्याच दिसत आहे.

COMMENTS