काँग्रेसचे नेते बचावले, संघर्ष यात्रेतील बसचा अपघात थोडक्यात टळला !

काँग्रेसचे नेते बचावले, संघर्ष यात्रेतील बसचा अपघात थोडक्यात टळला !

यवतमाळ – काँग्रेसचे नेते थोडक्यात बचावले असून संघर्ष यात्रेतील बसचा अपघात थोडक्यात टळला  आहे. मोर्शीवरून चांदुरकडे जाताना काँग्रेस नेत्यांची बस आणि एका डंपरची धडक होता होता टळली आहे. डंपर चालकाने वेळेत प्रसंगावधान ठेवत डंपर बाजूला घेतल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. डंपर रस्त्याच्या कडेला मातीत रुतला असून खानापूर गावाजवळ 2:55 वाजता ही घटना घडली आहे.

दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्याची एकच बाजू सुरू आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावर काँग्रेस नेत्यांची मोठी बस आणि डंपर समोरासमोर आल्याने ही घटना घडली आहे. त्या बसमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे व इतर सर्व वरिष्ठ नेते बसले होते. त्यामुळे ही मोठी घटना टळली आहे.

COMMENTS