सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड, मंत्रिमंडळातील  21 मंत्र्यांचे राजीनामे?

सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड, मंत्रिमंडळातील 21 मंत्र्यांचे राजीनामे?

बंगळुरु – कर्नाटकमधील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं धडपड सुरु केली असून काँग्रेस- जेडीएस सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील 21 च्या 21 मंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. बंडखोरांना शमवण्यासाठी जेडीएसनं ही खेळी केली असल्याचं बोललं जात आहे. तसेच या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारत कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी केली आहे.

दरम्यान या घडामोडींमुळे कर्नाटक राज्य पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर असून सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसच्या 13 आमदारांनी तर एका अपक्ष आमदाराने विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. या आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपकडे झुकण्याची दाट शक्यता आहे.यावरुन भाजपकडून लोकशाहीचा अवमान होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर कर्नाटकात जे होत आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

COMMENTS