ब्रेकिंग न्यूज – राज्यातील काँग्रेसच्या 13 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळाली !

ब्रेकिंग न्यूज – राज्यातील काँग्रेसच्या 13 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळाली !

दिल्ली – प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसनं राज्यातल्या जिल्हाध्यक्षांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी नियुक्तींचा घोळ सुरू होता. अखेर आज त्याला मुहूर्त मिळालं आहे. रायगडच्या जिल्ह्याध्यक्षपदी माजी आमदार माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उस्मानाबादच्या जिल्ह्याध्यपदी प्रशांत चेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर जिल्हाध्यक्षांमध्ये उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदी राधाचरण करोटिया, मीरा भाईंदरच्या जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे, पनवलेच्या जिल्हाध्यक्षपदी आर सी घरत, नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे, जळगाव राधेश्याम चौधरी, वर्धा मनोज चांदुरकर, चंद्रपूर सुभाष धोटे, जालना राजाभाऊ देशमुख, कोल्हापूर ग्रामिण प्रकाश आवाडे, सातारा रणजितसिंह नाईक निंबाळकर, नवी मुंबई अनिल कौशिक यांना संधी मिळाली आहे.

PR-MAHARASHTRA DCC

COMMENTS