काँग्रेसच्या ‘या’ आमदाराविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल!

काँग्रेसच्या ‘या’ आमदाराविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल!

मुंबई – निवडणूक आयोगानं आज विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली. आचारसंहिताही आजपासून लागू झाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस आमदाराविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा आरोप केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आपण या प्रकरणी चौकशी करु, काही तथ्य आढळले तर त्याच्यावर कारवाई करु असे आश्वासन दिले आहे. आडम यांना लेखी तक्रार देण्यास मी सांगितलं आहे. पोलिसांमार्फत आपण याप्रकरणी कारवाई करु असं राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.

तसेच नरसय्या आडम यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ” आडम मास्तर यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी माझ्यावर आरोप केले असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS