सीएमओ ट्विटरच्या गडबडी मागचे कारण शोधू – अजित पवार

सीएमओ ट्विटरच्या गडबडी मागचे कारण शोधू – अजित पवार

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून राज्यात राजकारण तापले असताना गुरुवारी सीएमओच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यामध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. या नेमकं हे का झालं? जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. नक्की काय झालं याची शहानिशा करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद नामांतरवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. नेमकं हे का झालं? जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. नक्की काय झालं याची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं ते म्हणाले.

COMMENTS