त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे”.

त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे”.

मुंबई – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विरोधक यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे.

ठाकरे म्हणाले, “देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं”.

बांधकाम सुरु असून विद्युत बिघाडामुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. काम नेमकं काय सुरु होतं याची माहिती संपूर्ण आग विझल्यानंतर येईल असंही ते म्हणाले. जीवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही आगीची माहिती देताना असे सांगितले आहे की, आग आटोक्यात येत असून या आगीत लस बनविण्याचा विभाग सुरक्षित असल्यांचे सांगितले.

COMMENTS