मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार आहे. यापूर्वी मी वारी पाहिली आहे. हेलिकॉप्टरमधून पाहिला. त्याचं मी पहावा विठ्ठल पुस्तकही तयार केलं आहे. यापूर्वी मी विठ्ठल मंदिरात जाऊन नाही, बघितला पण हेलिकॉप्टरमधून बघितला. हेलिकॉप्टरमधून मी विठ्ठलाचं विश्वरूप पाहिलं आहे. हजारो वारकरी रिंगण करून विठ्ठलाचं नामस्मरण करतात. यंदा मी मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. या संकटातून बाहेर काढण्याचं साकड विठ्ठलाला घालणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत हा लॉकडाउन जाहीर केलेला आहे. लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवा. लॉकडाउन उठणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहोत. एक एक गोष्ट सुरू करत आहोत. मिशन बिगीन अगेन करताना काळजीपूर्वक करत आहोत. धोका टळला आहे, अशा भ्रमात राहू नका. करोनापासून वाचण्यासाठी घरात रहा. अनावश्यक नाही, तर आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

COMMENTS