दुष्काळाबाबत 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेणार – मुख्यमंत्री

दुष्काळाबाबत 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेणार – मुख्यमंत्री

मुंबई – राज्याला यावर्षीही दुष्काळाच्या जोरदार झळा बसत आहेत. मराठवाडा, विदर्भात पाऊस कमी पडल्यामुळे अनेक शेतक-यांचं मोठ नुकसान झालं आहे. या विभागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा करण्यात आली आहे. याबाबत बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. 2016 च्या मॅन्युअलमध्ये केंद्राने निकष तयार केले आहेत. त्यानुसार माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान 200 तालुक्यात पाणी टंचाई आहे, त्यावर पुढची कारवाई केली जाणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर केंद्र पहाणी करून दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेईल कारण हा केंद्राचा निर्णय आहे. पाणीसाठ्याबाबत आढावा घेतला, सर्व मंत्री राज्यमंत्री हे तालुक्यात जाऊन टंचाईबाबत आढावा घेतील, ग्राउंड रिपोर्ट देतील. त्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS