‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत उदयनराजेंनी सोडलं मौन!

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत उदयनराजेंनी सोडलं मौन!

पुणे – देशभरात वादंग माजलेल्या
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मौन सोडलं आहे. या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला आहे.
लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही.  छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही असंही उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

COMMENTS