कांदा उत्पादक शेतकय्रांसाठी छगन भुजबळ आक्रमक, उद्या शरद पवारांची भेट घेणार – छगन भुजबळ

कांदा उत्पादक शेतकय्रांसाठी छगन भुजबळ आक्रमक, उद्या शरद पवारांची भेट घेणार – छगन भुजबळ

मुंबई – देशातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंद केली आहे व्यापाऱ्यांवर केंद्र सरकार इन्कम टॅक्सच्या मार्फत दबाव टाकत असून एकाप्रकारे केंद्र सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याची जोरदार टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी काम करते की परदेशातील व्यापार्‍यांसाठी काम करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात मोठ्याप्रमाणात कांदा असताना देखील केंद्र दुसऱ्या देशातून कांदा निर्यात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना चौकट उत्पन्न मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र देशातील शेतकरी सोडुन ते परदेशातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चौपट फायदा करून देत आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भात लवकरच आयात बंदी उठवावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

COMMENTS