राज्यातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राचे 1 लाख 15 हजार कोटींचे पॅकेज, ‘हे’ मोठे प्रकल्प होणार पूर्ण !

राज्यातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राचे 1 लाख 15 हजार कोटींचे पॅकेज, ‘हे’ मोठे प्रकल्प होणार पूर्ण !

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळानं महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बळीराजा चेतना अभियानांतर्गत महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांना पॅकेज देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. तसेच राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 1 लाख 15 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या १४ जिल्ह्यांमध्ये बळीराजा जलसंजीवनी योजना राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर १०८ सिंचन प्रकल्प हाती घेतले असून १३ हजार ६५१ कोटी रूपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. तसेच उर्वरित ९ हजार ८२० कोटी रूपये नाबार्डकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकल्प मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून याचा मोठा फायदा शेतक-यांना होणार आहे. या प्रकल्पामुळे१० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.

एकूण १०८ प्रकल्पांपैकी  विदर्भात ६६ तर मराठवाड्यात १७ प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीतील टेंभू प्रकल्प, सुलवाडे धुळ्यातील प्रकल्प आणि अकोल्यातील पूर्णा बॅरेज प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी १ लाख १५ हजार कोटी रूपये पंतप्रधान सिंचन योजनेतून दिले जाणार असल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.

 

हे प्रकल्प होणार पूर्ण

१. टेंभू, सातारा

२. उर्मोडी , सातारा

३. सुलवडे जामफळ , धुळे

४. शेलगांव बॅरेज, जळगांव

५. घुशी बॅरेज , अकोला

६. पुर्णा बॅरेज, अकोला

७. जिगांव, बुलढाणा

८. वारखेड-लोंढे , जळगांव

COMMENTS