आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

1) आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या सुपारी, नारळ या फळ झाडांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

2) या बैठकीत पीक पाणी परिस्थितीविषयी देखील निर्णय घेण्यात आला आहे.

3) कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीला आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

4) अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

5) तसेच नांदेड महापौर, उपमहापौर निवडणूक आणखी 3 महिने पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला आहे.

COMMENTS